नूतन पोलीस अधीक्षकांसमोर असणार अवैध धंद्याची मोठी आव्हाने


नूतन पोलीस अधीक्षकांसमोर असणार अवैध धंद्याची मोठी आव्हाने
शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन चक्री वादळासारखा अवैध व्यवसाय फोफावत असून, यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन सट्टा, जुगार, फेक कर्ज अ‍ॅप्स, आणि खोट्या वेबसाइट्सच्या माध्यमातून अनेक नागरिकांची फसवणूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक असलेले आणि जिल्ह्यात नियुक्त झालेले नवीन पोलीस अधीक्षक रितू खोखर (एसपी) यांच्यासमोर ही एक मोठी आव्हानात्मक जबाबदारी असणार आहे.

नवीन एसपींच्या नेतृत्वाखाली पोलिस प्रशासनाने आधीच काही प्राथमिक हालचाली सुरू केल्या असून, शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथके तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आल्याचे सूत्रांनी सांगितले.

ऑनलाईन गुन्ह्यांची एक वेगळीच धाटणी असून, हे गुन्हे पारंपरिक स्वरूपापेक्षा अधिक गुंतागुंतीचे आहेत. अनेक वेळा या गुन्ह्यांचा मुळापर्यंत जाण्यासाठी आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय यंत्रणांशी समन्वय साधावा लागतो. यासाठी नवीन एसपींनी राज्य सायबर युनिटसह सातत्याने संपर्कात राहून संयुक्त कारवाईचे संकेत दिले आहेत.

शहरातील काही गुन्हेगारांनी ऑनलाईन चक्री ,पत्त्यांचे क्लब, सट्टा आणि गेमिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तरुण पिढीला आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. यातून तरुणांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान होत असून, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. हे थांबविण्यासाठी केवळ पोलिसी कारवाईच नव्हे तर जनजागृतीही तितकीच गरजेची आहे.

अवैध व्यवसायात राजकीय हस्तक्षेप, स्थानिक दबाव गट, तसेच काही शहर पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांच्या सौम्य भूमिकेमुळे पूर्वीचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. मात्र नव्या एसपींच्या पारदर्शक आणि कडक कारवाईच्या भूमिकेमुळे जनतेमध्ये काहीशी आशा निर्माण झाली आहे. शहरवासीय आता याकडे अधिक आशावादी दृष्टीने पाहत आहेत.

येत्या काही महिन्यांत एसपींच्या कारभाराची खरी परीक्षा होणार असून, ऑनलाइन अवैध धंद्यांवर लगाम घालण्यात ते कितपत यशस्वी ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जनतेच्या सहकार्याने आणि प्रामाणिक कारवाईनेच शहराला या चक्री वादळातून बाहेर काढता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आणखीन सविस्तर बातमी लवकरच

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक