उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून 'धाराशिव' करण्यास यश- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून 'धाराशिवकरण्यास  यश

- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

 

          महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार " उस्मानाबाद " या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून "धाराशिव" असे करण्यास केंद्र सरकारकडून पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. गृह मंत्रालयाच्या दिनांक २ डिसेंबर २०२४ च्या पत्रानुसारया नाव बदलाच्या प्रस्तावावर भारतीय सर्वेक्षण विभागाची टिप्पणी मागवण्यात आली होती. यानंतर देखील उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे धाराशिव असे नामांतर करण्याबाबत संथ गतीने प्रक्रिया सुरू होती. या अनुषंगाने खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी सह बैठक घेऊन सदर स्थानकाचे नाव धाराशिव असे नामांतरित करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करणे बाबत सूचित केले होते तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री मा.ना.श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडून पत्राव्दारे पाठपुरावा केला होता. त्यानुसार केंद्र  शासनाने उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नामांतर धाराशिव असे करण्यास मंजुरी दिली आहे.

        या निर्णयामुळे धाराशिव या प्राचीन ऐतिहासिक शहराला पारंपरिक ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असूनस्थानिक नागरिकांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे.        

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक