*N.s.s.e (नॅशनल स्कॉलर सर्च एक्झाम)परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी च्या तीन विद्यार्थ्यांचा राज्य गुणवत्ता यादीत. समावेश,शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा*

*N.s.s.e (नॅशनल स्कॉलर सर्च एक्झाम)परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी च्या तीन विद्यार्थ्यांचा राज्य गुणवत्ता यादीत. समावेश,शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा*
 *ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने यशस्वी विद्यार्त्यांचा सत्कार संपन्न* 

धाराशिव, वार्ताहर 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी येथील इयत्ता तिसरी व चौथी मधील एकूण 19 विद्यार्थी एन. एस. एस. ई ( नॅशनल नॅशनल स्कॉलर सर्च एक्झाम )या परीक्षेमध्ये बसवले होते. त्यापैकी 100% टक्के विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण होऊन पात्र झालेले आहेत .त्यामधील राज्य गुणवत्ता यादीमध्ये शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे यामध्ये इयत्ता चौथी मधील
1 ) कुमारी निंबाळकर श्रद्धा गणेश 186/200 गुण घेऊन राज्यामध्ये सातवा क्रमांक  पटकावलेला आहे .
2) इयत्ता तिसरी तील कु. आरोही पांडुरंग कदम   178/200 गुण घेऊन राज्यांमध्ये  बारावा क्रमांक आला आहे. 
3)स्वराज अण्णासाहेब राऊत  176 /200गुण घेऊन राज्यात तेरावा क्रमांक मिळवलेला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक झाले शाळेच्या वतीने सदर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.शालेय अभ्यासक्रमबरोबर शाळेत विविध प्रकारच्या सात राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते. व सर्वच स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी घावघवीत यश संपादन केले आहे असे मुख्यापक श्री बशीर तांबोळी यांनी प्रस्ताविकामधून सांगितले,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अळणीचे सरपंच प्रमोद वीर होते ,प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच कॖष्णा गाडे,  शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मा. श्रीमती संजीवनी पौळ, उपाध्यक्ष मा. श्रीमती अफसाना शेख,माजी शा व्य.समिती अध्यक्ष विजय कुमार नांदे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य निलेश देशमुख,अनिता पौळ,हे होते, यावेळी किरण कोळी, तात्यासाहेब वीर, धनंजय वीर, नवनाथ गाडे, मधुकर कोरे, तानाजी एडके, उषा यादव, श्रीदेवी माळी, मनीषा कदम, यादव,हनुमंत तौर,गणेश निंबाळकर, निलेश निंबाळकर, संस्कृती थोरात, सद्दाम हुसेन मुजावर, बालाजी यादव, काजल पोळ, ज्ञानेश्वर निंबाळकर, नवनाथ गाडे, शहाजी माळी, पूजा कोरे, अण्णासाहेब राऊत, पांडुरंग कदम, बाजीराव केसरे, अमोल कोरे, सागर कोरे, राहुल शिंदे, राजेंद्र कदम, रेश्मा माने, भाग्यश्री राऊत, राहुल पोळ, राधिका कांबळे, श्रीमती नीता गाडे, लक्ष्मी पोळ हे उपस्थित राहून सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.व या वर्गाला  शिकवणाऱ्या श्रीमती ढगे मॅडम व श्रीमती म्हेत्रे मॅडम तसेच डोंगरे मॅडम यांचं मुख्याध्यापकांनी कौतुक केलं.कार्यक्रमचे सूत्रसंचालन श्रीमती सत्यशीला म्हेत्रे यांनी करणे आभार श्री दिनेश पेठे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक