*निपुण भारत अंतर्गत चावडी वाचन उपक्रम आमदारांच्या उपस्थितीत संपन्न*अळणी शाळेच्या पहिली दुसरी च्या विद्यार्थ्यांनी असखलीत पणे इंग्रजी व मराठीचे केले वाचन*
**निपुण भारत अंतर्गत चावडी वाचन उपक्रम
आमदारांच्या उपस्थितीत संपन्न*अळणी शाळेच्या पहिली दुसरी च्या विद्यार्थ्यांनी असखलीत पणे इंग्रजी व मराठीचे केले वाचन*
महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे निपुण भारत अभियानाच्या अंतर्गत चावडी वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमाला आमदार सन्माननीय श्री कैलास दादा घाडगे पाटील यांची उपस्थिती लाभली. शाळेचे मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या साहित्यकृतींचे चावडी वाचन सादर केले. इयत्ता पहिली व दुसरी च्या विद्यार्त्यांनी इंग्रजीचे व मराठीचे अस्सखलीत वाचन केले या वेळी या वेळी आमदार महोदय यांनी व डायट चे प्राचार्य श्री दयानंद जटनूरे यांनी शाळेचे व शिक्षकांचे कौतुक केले व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व अळणी शाळेने जिल्ह्यात गुणवत्तेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे असे प्रतिपादन केले या वेळी आमदारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “निपुण भारत अभियानाच्या माध्यमातून मुलांमध्ये वाचन, लेखन आणि गणन कौशल्ये विकसित होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांची शैक्षणिक प्रगती जलद होते.”
उत्कृष्ट आणि अस्सखलीत वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आमदार महोदयांनी शाल घालून सत्कार केला आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.व इतर काही शाळेतील नववी, दहावी च्या मुलांना इंग्रजी वाचन करता येत नाही पण अळणी शाळेतील पहिली व दुसरीचे मुले इंग्रजी चे अस्सखालीत पणे वाचन करतात याबद्दल गौरोदगार काढले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गोष्टी, कविता आणि प्रासंगिक वाचन व लेखनाने उपस्थितांना प्रभावित केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव चे प्राचार्य डॉक्टर श्री दयानंद जेटनुरे साहेब यांनी निपून भारत विषयी सविस्तर माहिती सांगितली आणि सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी येडशी बिट चे शिक्षण विस्तार अधिकारी श्री प्रकाश पारवे साहेब उपळा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शेषराव राठोड येडशी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विवेक सरवदे केंद्रीय मुख्याध्यापक श्री राजाभाऊ गाढवे व बीट मधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल, तसेच त्यांचे भाषिक आणि बौद्धिक कौशल्य विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास शाळेच्या प्रशासनाने व्यक्त केला.
या वेळी कार्यक्रसाठी गावातील उपसरपंच श्री कृष्णजी गाडे, पोलीस पाटील प्रमोद माळी, तंटामुक्ती अध्यक्ष श्री शामसुंदर लावंड,शालेय व्यवस्थापण समिती चे अध्यक्ष श्रीमती संजीवनी पौळ, उपद्यक्ष श्रीम. अफसाना शेख, सदस्यां श्रीमती अनिता पौळ, माजी अध्यक्ष विजयकुमार नांदे,श्री वैभव वीर, श्री महेश वीर,निलेश कदम,श्री अण्णा कदम श्री विकास पाटील, श्री रवी कोरे,जयवंट चौगुले, पवन माळी, संदीप वीर, मधुकर कोरे, दादा गायकवाड, किरण कोळी,ज्ञानेश्वर निंबाळकर सुनील माळी येडशी बिट मधील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम सत्यशीला म्हेत्रे यांनी केले आभार प्रदर्शन श्री, हनुमंत माने यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेती श्री दिनेश पेठे सर श्री उत्तम काळे सर श्रीमती वर्ष्या डोंगरे मॅडम, श्रीमतीसुनीता कराड कराड, मॅडम श्रीमती मंजुषा नरवटे मॅडम, श्रीमती क्रांती मते मॅडम ,श्रीमती सुलक्षणा ढगे मॅडम, श्रीमतीराधा वीर मॅडम, व युवा प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी श्री दादासाहेब कचरे कचरे सर सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.