धाराशिव शहरातील रस्त्याची कामे तत्काळ करणे व कचरा डेपो स्थलांतरीत करण्यासाठी आमरण उपोषण.

धाराशिव शहरातील रस्त्याची कामे तत्काळ करणे व कचरा डेपो स्थलांतरीत करण्यासाठी आमरण उपोषण..
धाराशिव ता. 28: धाराशिव शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्यावरील खड्डयामुळे अनेकांचा बळी गेला तर अनेकजण जायबंदी झाले. तसेच कचरा डेपो स्थलांतरीत करावा या मागणीसाठी अनेकदा आंदोलने झाली. या कचरा डेपो मुळे स्थानिक नागरिकांना विविध व्याधीना सामोरे जावे लागत असून लहान मुलांचे तर भवितव्य धोक्यात आले आहे. एवढा गंभीर विषय असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, युवा सेना शहर प्रमुख रवी वाघमारे व काँग्रेसचे जिल्हाव्यवस्थापक व प्रसिद्धीप्रमुख सरफराज काझी यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर महाविकास आघाडी हे आंदोलन सुरु करण्यात आले. या दरम्यान उपोषण स्थळी मा. खा. श्री. ओमप्रकाश आनंदीदेवी भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर आणि मा. आ. श्री. कैलास अनुराधा बाळासाहेब घाडगे – पाटील यांनी भेट दिली.

रस्ते होत नसल्याने अनेकदा आंदोलन झाली पण प्रशासन ढिम्म आहे. संतप्त धाराशिवकरांनी जानेवारी मध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केले. नगर परिषद प्रशासनाने तब्बल नऊ महिने रखडलेली निविदा प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करुन 28 फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्षात कामे सुरु करण्याचे लेखी आश्वासन नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र त्यानंतरही ही कामे रखडलेली असून परिस्थिती जैसे थे आहे. याच प्रमाणे कचरा डेपो स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठीही अनेकदा आंदोलन झाली. नगर पालिका व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन केली तरीही त्याची दखल प्रशासन घेत नाही. त्यामुळे या तीघांनी अखेर उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव नगरपालिकेला शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी 140 कोटी (59 डिपी रस्ते) रुपये खर्चाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्राप्त झालेली असून, त्यामध्ये प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर सात दिवसांच्या कालावधीत निविदा काढणे व तीन महिन्यांच्या कालावधीत कार्यारंभ आदेश देणे व प्रत्यक्षात कामे सुरू करणे बंधनकारक आहे. या प्रकल्पाची कार्यान्वित यंत्रणा नगरपरिषद धाराशिव आहे. असे असताना देखील अद्यापही या कामांना जाणूनबुजून सुरुवात करण्यात आलेली नाही. रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर असताना कामे न करता शहरातील जनतेला वेठीस धरण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. सायंकाळी नगर परिषदेचे उप मुख्याधिकारी पवार साहेब व शिष्टमंडळ उपोषणकर्ते यांना उपोषण पाठीमागे घ्या अशी विनंती केली त्यास उपोषण कर्ते यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत आम्ही उपोषण सोडणार नाहीत असे सांगितले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक