धाराशिव येथे रविवारी लोकमंगल फाउंडेशन आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
धाराशिव (प्रतिनिधी)....
लोकमंगल फाउंडेशन च्या वतीने रविवार दि. 20 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजून 27 मिनिटांनी छाया दीप मंगल कार्यालय जिल्हा दूध संघ समोर, छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रोहन देशमुख यांनी दिली.
"विवाह" हा एक जीवनातील महत्त्वाचा टप्पा तो पार असताना समाजातील सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. विवाहवेळी येणाऱ्या अडचणी नाहक होणाऱ्या पैशांची उधळण, जाचक हुंडापद्धती, मनुष्यबळाची अडचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टींचा विचार करून रोहन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेकवर्षांपासून लोकमंगल फाऊंडेशन च्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन करीत आहोत. आजपर्यंत सोलापूर व धाराशिव मध्ये गेल्या 19 वर्षापासून जवळपास 3124 जोडपी लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाली आहेत. यंदा सामुदायिक विवाह सोहळ्याचे विसावे वर्ष आहे यावेळी 23 जोडप्यांचा विवाह होणार आहे.
या विवाह सोहळ्यात जोडप्याना मणी मंगळसूत्र, जोडवी, हळदीचे कपडे अक्षदाचेचे कपडे, बूट,चप्पल, संसार उपयोगी भांडी देण्यात येणार आहॆ. या विवाह सोहळ्यात सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.