जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्या2025निमित्त पाणी वापर संस्थेचे चर्चासत्र

जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्या2025निमित्त पाणी वापर संस्थेचे चर्चासत्र
धाराशिव : प्रतिनिधी
येथील पाटबंधारे विभागाच्या वतीने जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्यानिमित्त पाणी वापर संस्थेच्या चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन २८ एप्रिल रोजी करण्यात आले होते. हे चर्चासत्र श्री.विजय थोरात,अधिक्षक अभियंता , धाराशिव पाटबंधारे मंडळ धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी पाटबंधारे विभाचे कार्यकारी अभियंता  अजित मदने, उपसा सिंचन विभागाचे श्री.प्रविण चावरे, कार्यकारी अभियंता कृष्णा मराठवाडा श्री अमोल नाईक,  कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग सलिम आवटे,  ,श्री.दिनेश खट्टे, सामाजीक कार्याकरते  श्री.राजेंद्र कासार, आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील आळणी येथील साठवण तलाव क्र. १ प्रकल्पावरील पाणी वापर संस्थेचे चेअरमन महेबूब पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व लाभार्थी शेतकºयांना श्री.सलीम आवटे यांनी २०२५ च्या कायद्याविषयी मार्गदर्शन केले. या मंडळ कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांनाही त्यांनी संबोधित केले. मदने यांनी पाणी वापर संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. राजेंद्र कासार यांनी २५ वर्षाचा पाणी वापर संस्थेचा अभ्यास सांगितला. त्यामध्ये संस्थेचे वार्षिक लेखाजोखा कसा करावा, ग्रामसभेत संस्थेबाबत प्रश्न कसे मांडावेत, संस्थेचे नाव कशा पद्धतीचे असावे याबाबत माहिती दिली. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक कनिष्ठ अभियंता आसावरी चोबे व आभार व्ही. के. पुजारी यांनी मानले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक