रमजान ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम समाजातील गोरगरीब कुटुंबांना साहित्य वाटपशिवसेनेचे शहर संघटक प्रशांत (बापू) साळुंके यांचा उपक्रम

रमजान ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम समाजातील गोरगरीब कुटुंबांना साहित्य वाटप

शिवसेनेचे शहर संघटक प्रशांत (बापू) साळुंके यांचा उपक्रम
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव, दि.30 -
पवित्र रमजान ईदच्या सणानिमित्त मुस्लिम समाजातील गोरगरीब कुटुंबांना रमजान ईद सणासाठी लागणार्‍या साहित्याचे किट वाटप करण्यात आले. शिवसेनेचे शहर संघटक प्रशांत (बापू) साळुंके यांच्या पुढाकाराने प्रभाग 4 मध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय (नाना) शिंगाडे व प्रशांत (बापू) साळुंके यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ ईद सणाच्या पूर्वसंध्येला रविवार, 30 मार्च रोजी करण्यात आला.

मुस्लिम समाजात सर्वात मोठा रमजान ईदचा सण आहे. आर्थिक परिस्थिती अथवा इतर अडचणीमुळे अनेकजण हा सण आनंदाने साजरा करु शकत नाहीत. दोन दिवसांपूर्वीच दिलेल्या इफ्तार पार्टीनंतर समाजातील ही परिस्थिती ओळखून प्रभाग 4 मधील गालिब नगरसह मिल्ली कॉलनी, शिरीन कॉलनी, रजा कॉलनी भागातील गोरगरीब मुस्लिम कुटुंबांची माहिती श्री.साळुंके यांनी घेतली. त्यानंतर रविवारी सकाळी रमजान ईद सणासाठी लागणार्‍या  साहित्याचे किट गोरगरीब कुटुंबीयांच्या घरोघरी जाऊन वाटप केले. यावेळी जमशेद पठाण, पाशाभाई शेख, युवराज राठोड, रोहित गाभणे, प्रतीक कदम अजित बाकले, दत्ता सोकांडे, बच्चा गाभणे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बांधवांनी हिंदु बांधवांना देखील ईदच्या शुभेच्छा दिल्या.

शिवसेनेचे शहर संघटक प्रशांत (बापू) साळुंके हे दरवर्षी विविध धार्मिक सण, उत्सवांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन कार्यरत असतात. गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव, रमजान ईद असो अथवा इतर सण उत्सवांबरोबर प्रभाग 4 मधील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी शासनदरबारी सतत पाठपुरावा करतात. या प्रभागामधील समस्यांसाठी खासदार, आमदारांकडे पाठपुरावा करुन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन घेतला. या निधीमधून रस्ते, नाल्या, हायमास्ट लॅम्पची रखडलेली कामे पूर्ण झाली असून पावसाळ्यात नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक