*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी शाळेमध्ये मा. आमदार श्री कैलास दादा पाटील यांच्या हस्ते इयत्ता पहिली प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश व वासंतीक वर्गाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न*

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी शाळेमध्ये मा. आमदार श्री कैलास दादा पाटील यांच्या हस्ते इयत्ता पहिली प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश व वासंतीक वर्गाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न*
राहुल कोरे आळणीकर 

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी  येथे इयत्ता पहिली वर्गाचा वासंतीक वर्गाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून धाराशिव कळंब मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय श्री कैलास दादा घाडगे पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून तर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था धाराशिव चे प्राचार्य डॉ.श्री दयानंद जटनुरे साहेब उपस्थित होते.तर येडशी बिट चे शिक्षण विस्तार अधिकारी श्री प्रकाश पारवे, येडशी केंद्र प्रमुख श्री विवेक सरवदे, उपळा चे केंद्रप्रमुख श्री शेषेराव राठोड, येडशी बिट मधील सर्व मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती शाळेच्या मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे अळणी या गावातील इयत्ता पाहिलीसाठी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचा दिनांक एक मार्च ते तीन मार्च या कालावधीत सर्व्हे करण्यात आला व सर्व प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना मराठी शाळेचे महत्व सांगण्यात आले व अळणी गावात एकूण 47 विद्यार्थी प्रवेश पात्र निघाली त्या सर्व विद्यार्थ्यांमद्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावि म्हणून विविध प्रकारच्या मनोरंजक खेळातून त्यांना शाळेचा लळा लागावा व त्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना 29 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत त्यांना शाळेत प्रवेशित करून त्यांना अध्यापन करण्यात येणार आहे प्रवेश पात्र 46 विद्यार्थ्यापैकी 42 विद्याथ्यांनी जिल्हापरिद प्राथमिक शाळा अळणी या शाळेत प्रवेश घेतला आहे उर्वरित चार विद्यार्थी पारगावी गेल्यामुळे आज उपस्थित नव्हते या सर्व नवीन प्रवेश पात्र विद्यार्त्याना साखरेचा हार देऊन मा. आमदार कैलास दादा पाटील यांच्या हस्ते नूतन विद्यार्थ्यांना जिल्हापरिषद शाळेत प्रवेश देण्यात आला. 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले पूजनाने झाली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून वासंतीक वर्गाच्या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण मिळावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने वासंतीक वर्गाची संकल्पना साकारण्यात आली आहे.

शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून या वर्गासाठी विशेष सजावट केली. विविध फुलझाडे, औषधी वनस्पती, आणि नैसर्गिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षणाचा माहोल तयार करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनाचा एक वेगळा अनुभव मिळणार असून, त्यांचे शैक्षणिक जीवन अधिक आनंददायी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.कार्यक्रसाठी उपसरपंच श्री कृष्णजी गाडे, पोलीस पाटील प्रमोद माळी, तंटामुक्ती अध्यक्ष श्री शामसुंदर लावंड,शालेय व्यवस्थापण समिती चे अध्यक्ष श्रीमती संजीवनी पौळ, उपद्यक्ष श्रीम. अफसाना शेख, सदस्यां श्रीमती अनिता पौळ, माजी अध्यक्ष विजयकुमार नांदे,श्री वैभव वीर, श्री महेश वीर,निलेश कदम,श्री अण्णा कदम श्री विकास पाटील, श्री रवी कोरे,जयवंट चौगुले, पवन माळी, संदीप वीर, मधुकर कोरे, दादा गायकवाड, किरण कोळी,ज्ञानेश्वर निंबाळकर सुनील माळी येडशी बिट मधील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम सत्यशीला म्हेत्रे यांनी केले आभार प्रदर्शन श्री, हनुमंत माने यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  शाळेती  श्री दिनेश पेठे सर श्री उत्तम काळे सर श्रीमती वर्ष्या डोंगरे मॅडम, श्रीमतीसुनीता कराड कराड, मॅडम श्रीमती मंजुषा नरवटे मॅडम,  श्रीमती क्रांती मते मॅडम ,श्रीमती सुलक्षणा ढगे मॅडम, श्रीमतीराधा वीर मॅडम, व युवा प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी श्री दादासाहेब कचरे कचरे सर सर्व शिक्षकांनी सहकार्य केले

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक