महायुतीचे खरेदी-विक्री संघांचे बिनविरोध संचालकांचा सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते

महायुतीचे खरेदी-विक्री संघांचे बिनविरोध संचालकांचा सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते
धाराशिव - शिवसेना मध्यवर्ती कार्यालय धाराशिव येथे  महायुतीच्या खरेदी विक्री संघ धाराशिवचे बिनविरोध निवडून आलेले संचालकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमात बिनविरोध निवडून आलेले संचालक म्हणून अनंतराव अण्णा देशमुख, गुणवंत पापा देशमुख,  किशोर देशमुख, सौ. मीरा जीवन बर्डे, रामेश्वर शेटे,  शिवाजी सरडे,  अण्णासाहेब पवार, दिनेश देशमुख,  सुभाष पाटोळे, सौ. मीरा इंगळे आणि गणेश दत्तात्रेय फंड यांचा समावेश आहे.

सत्कार समारंभानंतर जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करताना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. महायुतीच्या या बिनविरोध निवडीनंतर संघाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक