शिवसेनेकडून स्टॅंडअप कॉमेडीयन कुणाल कामरा विरोधात धाराशिव मध्ये तक्रार दाखल...
शिवसेनेकडून स्टॅंडअप कॉमेडीयन कुणाल कामरा
विरोधात धाराशिव मध्ये तक्रार दाखल...
धाराशिव -वादग्रस्त स्टॅंडअप कॉमेडीयन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विंडबनात्मक व्हिडीओ बनवत तो सोशल मिडिया वर प्रसारित केल्यामुळे महाराष्ट्रासह धाराशिव मधील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत, याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके व धाराशिव शिवसेनेच्या वतीने, धाराशिव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून, या तक्रारीमध्ये कुणाल कामराने वापरलेल्या अपशब्दामुळे तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने, महाराष्ट्रामधील एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम असणाऱ्या व्यक्तींच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवण्याचे काम कुणाल कामरा याने केलेले आहे, त्यामुळे त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे शिवसेनेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे...
यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, सरपंच अमोल पाटील, सुनील आप्पा शेरखाने, किरण (ताई) निंबाळकर, माया ताई,शिवसेना उपशहर प्रमुख रजनीकांत मळाळे, अभिजीत देडे, आकाश कोकाटे, नितीन देवकते, आदित्य हंबीरे,प्रशांत कोळी,ज्ञानेश्वर ठवरे, रवी देवकते,व शिवसैनिक उपस्थित होते.