क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त मध्यवर्ती समिती कार्यकारिणी जाहीरअमर माळी अध्यक्ष तर बळीराम माळी उपाध्यक्षपदी निवड

क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त मध्यवर्ती समिती कार्यकारिणी जाहीर
अमर माळी अध्यक्ष तर बळीराम माळी उपाध्यक्षपदी निवड

धाराशिव, दि. ११ मार्च (प्रतिनिधी) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९८व्या जयंतीनिमित्त यंदा भव्य आणि आकर्षक अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीची वैशिष्ट्ये म्हणजे  मिरवणूक, पारंपरिक वाद्यांचा गजर, आणि 100 मुलांचा लेझीम संघ पथकांचा भव्य जलसा हे असणार आहे.

या संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत मध्यवर्ती जयंती समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पृथ्वीराज चिलवंत होते. समितीच्या अध्यक्षपदी अमर भैय्या माळी, उपाध्यक्षपदी बळीराम माळी, सचिवपदी स्वराज जानराव, तर कोषाध्यक्षपदी सौदागर गोरे यांची निवड करण्यात आली.

मिरणूक प्रमुख -प्रविण वाघमारे,सौरभ देशमुख,केदर गोरे, यांची निवड करण्यात आली


जयंती निमित्ताने सोलापूर येथून पाच महापुरुषांचे पुतळे आणून त्यांची मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मिरवणुकीत 100 मुलांचा लेझीम संघ पथकांचा भव्य संचलन होणार असून, संपूर्ण शहरात आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे.

मार्गदर्शक मंडळात 
महादेव माळी,बलराज रणदिवे,कुणाल निबांळकर,
उमेशराजे निबांळकर ,मीनल काकडे, सुरज(महाराज) साळुंखे, अमित भैय्या शिंदे अमरसिंह देशमुख,डाँ.सचिन देशमुख, डाँ.सुधिर शिंदे,सिध्दार्थ(दादा) बनसोडे,
अशोक भोसले, दत्ता माळी, चंद्रशेखर सुरवसे, पृथ्वीराज चिलवंत, सुनील ढगे, चंद्रकांत गोरे, पांडुरंग गोरे, गोविंद गोरे, सुनील गोरे, भास्कर गोरे आणि राजू माळी,रविकांत गोरे,दत्ता भोसले,देवदत्त गोरे,अँड.शंकर माळी, यांचा समावेश करण्यात आला आहे.

या भव्य मिरवणुकीसाठी शहरातील नागरिकांमध्ये उत्सुकता असून, महात्मा फुले यांच्या विचारांचे प्रभावी प्रबोधन व्हावे यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक