महिला सशक्तीकरणासाठी महिलांनी आत्मनिर्भर व स्वावलंबी व्हावे – सुजाता मोरे

महिला सशक्तीकरणासाठी महिलांनी आत्मनिर्भर व स्वावलंबी व्हावे – सुजाता मोरे
धाराशिव – ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! स्त्रीशक्ती, रणरागिणी, ईश्र्वराची सुंदर निर्मिती ही महिलेचे अलंकार आहेत. ती समाजात कर्तव्याच्या सिंहासनावर विराजमान होऊन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असते. तिच्या उदरी वात्सल्य, प्रेम, माया, ममता, सौंदर्य, जिद्द, चिकाटी आणि सहनशीलता यांचा संगम असतो.

प्रत्येक व्यक्तीचा आयुष्यात एक आदर्श असतो. माझ्या जीवनातील आदर्श म्हणजे माझी आई! जागतिक महिला दिन हा महिलांच्या सशक्तीकरणासाठी, महिलांना सन्मान देण्यासाठी, पुरुष आणि महिलांमधील भेदभाव कमी करण्यासाठी तसेच महिलांना त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी साजरा केला जातो. आज महिलांनी जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यामुळेच हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो.

आजही महिलांनी आपल्या हक्कांसाठी लढा दिल्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. काही ठिकाणी या निमित्ताने महिलांना सुट्टी दिली जाते, तर काही ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मानही केला जातो. मात्र, वर्षभरातील केवळ एका दिवशी महिला दिन साजरा करून त्यांच्या संघर्षाची आणि योगदानाची जाणीव पूर्णपणे होऊ शकत नाही.

महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने अशा कार्यक्रमांतून महिलांना प्रोत्साहन मिळते आणि त्या आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित होतात. मी आणि माझ्यासह अनेक महिला गेल्या अनेक वर्षांपासून धाराशिव तालुक्यातील तुगांव येथे सी.आर.पी. उमेद अभियानाच्या माध्यमातून कार्यरत आहोत. या अभियाना अंतर्गत आम्ही वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम राबवतो, त्यातून मिळणारे समाधान हे महिला दिनाच्या निमित्ताने अधिकच आनंददायी वाटते, असे मत सौ. सुजाता नेताजी मोरे यांनी व्यक्त केले.

- सौ. सुजाता नेताजी मोरे
सी.आर.पी. उमेद अभियान, तुगांव

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक