*शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोर्‍हे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन*

*शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोर्‍हे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन*

धाराशिव, दि.27 -
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ.नीलम गोर्‍हे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी धाराशिव येथे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारुन निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे निषेध आंदोलन करण्यात आले. 

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली जाते. परंतु ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोर्‍हे यांच्याबाबत अत्यंत हीन पातळीवर जाऊन वक्तव्य केले. संजय राऊत हे दररोज कोंबड्यांनी बांग द्यावी तसे बेताल वक्तव्य सकाळपासून करत सुटतात. त्यांना त्यांना सदबुद्धी मिळो म्हणून आम्ही हे आंदोलन करुन त्यांच्या प्रतिमेस जोडे हाणले आहेत. यापुढे त्यांनी जिभेचा तोल सांभाळावा, असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांनीही खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. 

आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, किरणताई निंबाळकर, मायाताई चव्हाण, शिवउद्योग सेना आघाडीचे जिल्हाप्रमुख सुनीलअप्पा शेरखाने, शहर संघटक रणजित चौधरी, कामगार सेनेचे अरुण डोलारे,  उपशहरप्रमुख रजनीकांत माळाळे,  ओबीसी विभाग शहरप्रमुख यश हंचाटे, प्रवीण पवार, अजय नाईकवाडी, सादिक तांबोळी, वाल्मिक बनसोडे, धनाजी साळुंके, नितीन देवकते, अमर माळी, आनंद मोरे, ज्ञानेश्वर ठवरे, संकेत हाजगुडे, बबलू नवले, अजिंक्य आगलावे, राजेश माळाळे, समर्थ निंबाळकर, अमर मडके, प्रशांत कोळी, मयुर माळी, संदीप मोरे, अरुण डोलारे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक