अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या बदली तर त्यांच्या जागी पत्नी अफकत आमना
अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या बदली तर त्यांच्या जागी पत्नी अफकत आमना
धाराशिव दि.१ (अमजद सय्यद) - धाराशिव येथील अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अफकत आमना यांना बढती मिळाली आहे. त्यांची बदली अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून धाराशिव येथे करण्यात आली आहे.
मुंबई मंत्रालयातून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दि.२८ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आले आहेत. या आदेशात कनिष्ठ श्रेणीतील भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना भारत सरकार गृह मंत्रालय परिपत्रक ४५०२०/११/ ९७- आयपीएस - दोन दिनांक १५.०१. १९९९ व इंडियन पोलीस सर्विस पे रुल्स २०१६ यामधील तरतुदीनुसार वरिष्ठ समय श्रेणीत पदोन्नती देण्यात येत आहे. निर्दिष्ट पदावर पदोन्नती पद स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये धाराशिव येथील अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या शफकत आमना यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. त्या १ जानेवारी २०२३ पासून भोकर येथे कार्यरत होत्या. तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तेगबिर सिंग संधू यांची नाशिक ग्रामीण मालेगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज कुमार बच्चू यांची अमरावती ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेली एम.व्ही. सत्य साई कार्तिक यांची गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे अप्पर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील पैज पूल येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारीपदी कार्यरत असलेल्या अन्नपूर्णा सिंह यांची औरंगाबाद ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे बदली करण्यात आलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पंकज कुमावत, गौहर हसन व सुनील लांजेवार यांची अद्यापपर्यंत ठिकाणे दिलेली नाहीत. त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत.