*तेरच्या पीएमश्री उर्दू शाळेत डाॅ.सय्यद अर्शद यांचा मोटिवेश्नल कार्यक्रम संपन्न*

*तेरच्या पीएमश्री उर्दू शाळेत डाॅ.सय्यद अर्शद यांचा मोटिवेश्नल कार्यक्रम संपन्न*
    *पीएमश्री जिल्हा परिषद उर्दू शाळा तेर* येथे धाराशिव जिल्ह्याचे विख्यात मोटिवेश्नल स्पीकर *डॉ. सय्यद अर्शद* यांचा विद्यार्थी व पालकांसाठी करिअर गाइडंस अँड पॅरेंटिंग कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. पीएमश्री योजनेतील विविध उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बोलताना डॉ. सय्यद यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम, वैज्ञानिक शिक्षणाचे महत्व व कॉम्प्युटर, मोबाईल फोन चा वापर कसा करावा त्यासोबत पाल्यांना शिक्षणाचे महत्व कसे समजून सांगावे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष , उपाध्यक्ष,  शिक्षण तज्ञ सदस्य , ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे महिला पालकांनीही आवर्जून कार्यक्रमास उपस्थिती नोंदवली होती. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पीएमश्री नगरपरिषद शाळा क्रमांक ८ चे मुख्याध्यापक श्री सय्यद नईमुद्दीन सर , पटेल इफ्तेखार सर , जि.प.शिक्षक डोंगरे जाकीर सर आदी उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागतपर सत्कार करण्यात आले. मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ सदस्य श्री.जुनेद (बबलू)  मोमीन यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक *श्री शहा तय्यबअली सर*  यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक मोमिन कलीम सर , फुलमामडी तौफिक सर , खतीब मुमताज मॅडम, शेख अर्शिया मॅडम यांनी मेहनत घेतली. पीएमश्री योजनेतील सर्व उपक्रमांची उत्कृष्टरित्या व प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापक *श्री शहा तय्यबअली सर* यांचा सत्कार करण्यात आला.आनंददायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक