यशदा मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि धाराशिव सन-२०२५ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
यशदा मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि धाराशिव सन-२०२५ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
धाराशिव यशदा मल्टिस्टेट को ऑप क्रे सो लि धाराशिव सन-२०२५ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मुख्यशाखा धाराशिव येथे आज संपन्न झाला.दरवर्षी प्रमाणे यंदाच्याही दिनदर्शिकेचे स्वरूप वेगळे असून या वर्षी "महिमा देवींचा" या स्वरूपामध्ये दिनदर्शिकेचे प्रत्येक महिन्याच्या पानावर आदिशक्तीचे विविध शक्तीरूपांचे दर्शन असणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती संस्थेचे ज्येष्ठ खातेदार श्री कसपटे सर,दै. पुण्य नगरी चे वृत्तसंपादक धनंजय रणदिवे, दै. आरंभ मराठी चे संपादक चंद्रसेन देशमुख, यशदा बँकेचे चेअरमन सुधीर सस्ते CA मोसीन शेख,तसेच बँक ऑफ महाराष्ट्र धाराशिव शाखेचे मॅनेजर महेंद्रकुमार सिंह,संचालक काकासाहेब शिनगारे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मुख्यशाखा धाराशिव येथे संपन्न झाला.
याप्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश गरड आणि सर्व पदाधिकारी आणि परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.