*भटक्या विमुक्त बांधवांच्या पालावरील अजिंक्य संस्थे तर्फे 120 जणांना ब्लँकेट वाटप* *विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम*

*भटक्या विमुक्त बांधवांच्या पालावरील अजिंक्य संस्थे तर्फे  120 जणांना ब्लँकेट वाटप* 

*विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम*
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरकडील वंशज व महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी या संस्थेच्या वतीने तुळजापुर शहरातील भटक्या विमुक्त बांधवांच्या पालावर, व नळदुर्ग येथील भटके विमुक्तांच्या पालावर आणि मेंढपाळ व ऊसतोड कामगार ब्लँकेट वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव राम जवान बोलताना म्हणाले की तुळजापुर तालुक्यातील भटके विमुक्त बांधवांच्या पालावर जाऊन मेंढपाळ ऊसतोड कामगार यासह इतर भटके विमुक्त बांधवांना थंडी पासुन संरक्षण व्हावे म्हणुन ब्लँकेट चे वाटप करत आसल्याचे त्यांनी सांगितले.
येणाऱ्या काळात भटके विमुक्त विकास परिषद व अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या काळात भटके विमुक्त समाजातील विविध घटकांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार आहे. व येणाऱ्या काळात या सर्व बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भटके विमुक्त विकास परिषद धाराशिव जिल्हा संयोजक व अजिंक्य संस्थेचे सचिव राम जवान, शिक्षिका मीराताई मोटे, शिक्षका वर्षा ताई सोमवंशी, भारत मावशी देवकर, तानाजी धुते, संतोष जवान, मेघराज सुरवसे,आकाश धर्मे यांच्यासह भटके विमुक्त पालावरील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक