विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवर अजित पिंगळेंची तीव्र टीका



विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवर अजित पिंगळेंची तीव्र टीका
पानगाव - शिवसेना महायुतीचे कळंब-धाराशिव मतदार संघाचे उमेदवार अजित पिंगळे यांनी कुटुंबास राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवर कठोर शब्दात ताशेरे ओढले. विद्यमान आमदारांच्या कार्यप्रणालीमुळे स्थानिक जनतेचे नुकसान होत असून  विकासकामांमध्ये दुर्लक्ष केले जात आहे आणि याचा फटका नागरिकांना बसत आहे. 
 शिवसेना,भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस,घटक पक्ष महायुतीचे कळंब - धाराशिव मतदार संघाचे उमेदवार अजित पिंगळे यांनी दि.७ नोव्हेंबर २०२४ रोजी परतापूर,पानगाव, उपळाई,सापनाई व बारातेवाडी या गावात जावून मतदारांशी संवाद साधला.
याप्रसंगी सुरुवातीला गावातील मारुती मंदिरात अजित पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढविण्यात आले.
शिवसेना महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांचा गावकऱ्यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना पिंगळे यांनी मतदारांनी ग्रामीण भागाशी नाळ असणाऱ्या माझ्यासारख्या शेतकरी पुत्राला आपले अमूल्य मत देवून विधानसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आशीर्वाद द्यावे.
तसेच महायुती सरकारनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले.सर्वच क्षेत्रात मूलभूत सुविधा दिल्या.
यामुळे गावातील सर्व मतदारांनी येणाऱ्या २० तारखेला विधासभेच्या निवडणुकीत धनुष्य बाणावरील बटण दाबून भरघोस मतांनी विजयी करावे अशी विनंती केली.
याप्रसंगी महायुती आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक