शिवसेना महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांची धाराशिव शहरात रॅली संपन्न
कळंब - शिवसेना महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची भव्य रॅली धाराशिव शहरातील महिषासुर मर्दिनी प्रवेशद्वार येथून गवळी गल्ली येथे दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी यशस्वीरीत्या पार पडली.
या प्रचार रॅलीमध्ये महिला प्रचार संपर्क प्रमुख सौ.रंजना पिंगळे यांच्या सहित महिलांची आणि युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
धाराशिव शहरात जनतेच्या विविध समस्यांवर आणि विकासात्मक योजनांवर भर देणार असल्याचे मत अजित पिंगळे हे ठिकठिकाणी मतदारांशी व्यक्त करत होते. उपस्थित जनसमुदायाने या रॅलीत उत्साहाने सहभाग घेतला आणि उमेदवार अजित पिंगळे यांच्या नेतृत्वाला समर्थन दिले.
महिला आणि युवकांच्या मोठ्या संख्येने झालेल्या उपस्थितीने या रॅलीस अधिक जोश मिळाला, तसेच जनतेत उमेदवारांविषयी सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे दिसून आले.