शिवसेना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची धाराशिव संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट; विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा

शिवसेना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची धाराशिव संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट;
 विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा


धाराशिव: धाराशिव येथील शिवसेना संपर्क कार्यालयाला शिवसेना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. आपल्या खासदारकीची हॅट्ट्रिक करणारे आणि शिवसेनेचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जाणारे श्रीरंग आप्पा बारणे यांच्या या भेटीमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते श्रीरंग बारणे यांचा सत्कार करण्यात आला.

या भेटीदरम्यान धाराशिव आणि कळंब विधानसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने विविध विकासकामे, मतदारसंघातील गरजा आणि स्थानिक पातळीवरील समस्यांचा आढावा घेण्यासाठी ही चर्चा महत्त्वाची ठरली.

खासदार बारणे यांच्या या भेटीमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची धोरणे आणि रणनीती आखण्यासाठी एक संधी मिळाली आहे. जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर सविस्तर माहिती देत, मतदारसंघातील प्रमुख समस्या आणि विकासात्मक आव्हाने यावर चर्चा केली.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक