खासदाराच्या मनमानीला कंटाळून युवा सेना राज्य विस्तारक श्री.प्रतीक रोचकरी भाजपात प्रवेश..

खासदाराच्या मनमानीला कंटाळून युवा सेना राज्य विस्तारक श्री.प्रतीक रोचकरी भाजपात प्रवेश..
उबाठा गटाचे खासदार यांच्या मनमानीपणाला कंटाळून युवा सेनेचे राज्य विस्तारक प्रतीक रोचकरी यांनी शिवसेना उबाठा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. खासदाराच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत व आपल्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत रोचकरी यांनी सहकाऱ्यांसह भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.

मागील अनेक वर्षांपासून तुळजापूर तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यात युवकांचे सशक्त संघटन केले. त्यातून युवा सेना वाढवली. मात्र आपल्या कामाची दखल न घेता, नेहमी पाण्यात पाहिले गेले. खासदाराच्या मनमानीमुळे आणि पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करण्याच्या कार्यपध्दतीला कंटाळून शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत असताना वाईट वाटत असल्याची भावना रोचकरी यांनी व्यक्त केली. युवकांचे संघटन वाढवत असताना जिल्ह्यातील नेतृत्वाने कौतुकाची थाप देण्यापेक्षा नेहमी डावलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून आपण भाजपात प्रवेश करीत असल्याचे श्री.रोचकरी यांनी सांगितले.

आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुद्दावर भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी केला. त्यांच्यासह त्यांचे सहकारी पदधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेला खिंडार पडले आहे.

#vidhansabha #BJP4India #BJP4Maharashtra 
#Mahayuti4Vidhansabha2024 #Dharashiv #Mahayuti

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक