टक्केवारी खाणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदारांनी घरी बसवावे - अजित पिंगळे



टक्केवारी खाणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदारांनी घरी बसवावे - अजित पिंगळे 
कळंब - शिवसेना महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी दि.६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी कळंब तालुक्यातील  खडकी,लोहटा (पश्चिम),करंजकल्ला,लोहटा (पूर्व),हिंगणगाव,दाभा तर सायंकाळीच्या सुमारास शेलगाव (ज),सातेफळ,सौंदना,हळदगाव,वाघोली व शिंगीलो या गावांना भेट देत संवाद साधला.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर तीव्र शब्दात हल्ला चढविला.
महायुतीचे उमेदवार
अजित पिंगळे बैठकीत महाविकास आघाडीवर तीव्र शब्दात टीका केली. त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली.
अजित पिंगळे यांनी जनतेला आवाहन केले की,त्यांनी महाविकास आघाडीच्या अपयशी निर्णयांपासून सावध राहावे आणि त्यांना विकासाच्या दिशेने नेणाऱ्या महायुतीला संधी द्यावी.
तसेच "महाविकास आघाडीने सत्तेत येऊन जनतेच्या अपेक्षांचा कुठेच आदर ठेवला नाही. त्यांच्या निर्णयांमुळे राज्यात विकास ठप्प झाला आहे. आज जनता बदलाची मागणी करत आहे आणि महायुतीच ती सकारात्मक दिशा दाखवू शकते."
यावेळी उपस्थितांनी अजित पिंगळे यांच्या वक्तव्यांना जोरदार प्रतिसाद दिला आणि महायुतीच्या कार्यासाठी संपूर्ण पाठिंबा दर्शविला.

टक्केवारी खाणाऱ्या लोकप्रतिनिधींना घरी बसवा - विद्यमान आमदारांनी पाच वर्षात विकासकामे करून निवडणूकीला सामोरे जायचे सोडून जनतेला केवळ खोट्या गप्पा मारून एखादा विषय भावनिक करून त्यावर मते मागायची असा जणू धंदाच लावला आहे.आपल्या जवळच्या गुत्तेदारांना कामे देवून फक्त टक्केवारीवर पैसे खाणाऱ्या विद्यमान लोकप्रतिधींना मतदारांनी घरी बसवावे असे आवाहन केले.
कळंब तालुक्यातील मतदारांना आपल्या घरचा,हक्काचा तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला उमेदवारी मिळाली म्हणून अजित पिंगळे यांच्या भेटीदरम्यान मतदारात उत्साहाचे वातावरण होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक