परंडा मतदारसंघात ट्विस्ट पे ट्विस्ट, राहुल मोटेंचा मार्ग क्लिअर झाल्याची बातमी पसरताच रणजीत पाटलांचा मोठा दावा, म्हणाले...*

*परंडा मतदारसंघात ट्विस्ट पे ट्विस्ट, राहुल मोटेंचा मार्ग क्लिअर झाल्याची बातमी पसरताच रणजीत पाटलांचा मोठा दावा, म्हणाले...*
राहुल मोटे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, अशी माहिती समोर येताच रणजीत पाटील यांनी मोठा दावा केला आहे.

ठाकरे गटाचे रणजीत पाटील आणि शरद पवार गटाकडून राहुल मोटे  यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. ठाकरे गटाचे रणजीत पाटील हे परंडा विधानसभा मतदारसंघातून माघार घेणार, अशी माहिती समोर आली होती. मात्र, उमेदवारी मागे घेण्याची चर्चा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रणजीत पाटील यांनी फेटाळली आहे.

 आता याबाबत रणजीत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीतून मी माघार घेतलेली नाही अफवांवर विश्वास ठेवू नका. विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. पक्षाकडून अद्याप कुठलंही बोलणं झालेलं नाही. परंडा विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज कायम आहे., असे म्हणत उमेदवारी मागे घेण्याची चर्चा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रणजीत पाटील यांनी फेटाळली.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक