पारा येथे तुफान गर्दीच्या साक्षीने महायुतीची प्रचारसभा

पारा येथे तुफान गर्दीच्या साक्षीने महायुतीची प्रचारसभा
पारा, ता. वाशी - भूम-परांडा-वाशी या भागातील शेतकर्‍यांनी त्यांचा ऊस पार आटपाडीपर्यंत नेला. कारखान्यांअभावी अनेकांनी शेतावर ऊस तोडून टाकला. आपण शेतकर्‍यांसाठी साखर कारखाने सुरू केले. 'तेरणा' सुरू केला, 'शिवशक्ती' सुरू केला, 'नरसिंह' चार महिन्यांत सुरू होईल, आम्ही चुली पेटवतो, घरं नाही, असे सांगून, मी पाऊल ठेवले की विकास होतो, माजी आमदाराने पाऊल ठेवले, की दुष्काळ पडतो, अशा शब्दांत महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी पारा येथील जाहीर सभेतून विरोधकांवर टीकास्त्र डागले. या सभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उसळला होता. 

प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या नेत्यांची पारा येथे भव्य अशी जाहीर सभा पार पडली. या सभेतील अभूतपूर्व गर्दी पाहाता, वाशी तालुक्यातून प्रा. डॉ. सावंत यांना मोठ्या प्रमाणात लीड मिळणार असल्याचे चित्रच स्पष्ट झाले. याप्रसंगी बोलताना तानाजीराव सावंत म्हणाले, की आपण विकासाच्या राजकारणाला महत्व देत आलो आहोत. माझी तर विनंती आहे, की विरोधकांनीसुद्धा येथे येऊन ऐकावे व घरी जाऊन त्यावर चिंतन करावे, मग त्यांना कळेल त्यांच्या नेत्याचा ३५ वर्षांचा विकास काय आहे? आणि माझ्या मंत्रीपदाच्या काळात अडिच वर्षांचा विकास काय आहे ते! मागीलवेळी 'उजनी'च्या पाण्याचा मुद्दा घेऊन निवडणूक लढलो, आणि जिंकलो. निवडणूक निकालानंतर तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुखांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला छेद दिला. त्याला पहिला विरोध तानाजी सावंत यांनी केला. कारण, ते मला रूचलं, पचलं नाही. पहिले बंडाचे निशाण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून धाराशीव जिल्ह्यात फडकले. आणि, त्यानंतर उठाव केला व राज्यामध्ये सत्ता बदल घडवून आणला. शिवसेना शिंदे सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेसाठी १२ हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला, व 'उजनी'चे पाणी आपल्या सीना कोळेगाव धरणात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. सद्या हे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या गुढी पाडव्याला हे पाणी आपणास मिळणार आहे. सीना कोळेगावमधून हे पाणी भूम व वाशी तालुक्यांत येणार आहे. 'उजनी'तून मतदारसंघात आणलेल्या या पाण्याचा फायदा तीनही तालुक्यांना होणार आहे. त्यामुळे मी दिलेले वचन पूर्ण होत आहे. विरोधकांनी ३५ वर्षे या भागाला विकासापासून वंचित ठेवले, कारखान्यांअभावी येथील शेतकर्‍यांना त्यांचा ऊस पार आटपाडीपर्यंत न्यावा लागला. काहींनी कारखान्याअभावी बांधावर ऊस तोडून टाकला. आपण त्यासाठी जिल्ह्यांत कारखाने सुरू केले. त्यांनी तेरणा कारखाना १५ वर्षे बंद पाडला. दोघांच्या वादात शेतकर्‍यांचे नुकसान झाले. २०२३ ला आपण तेरणा सुरू केला, वाशीचा शिवशक्ती सुरू केला आहे, नरसिंह पुढील चार महिन्यांत सुरू होईल, मी पाऊल ठेवले की विकास होतो, माजी आमदाराने पाऊल ठेवले, की दुष्काळ पडतो. आपल्याला गेलेले सर्व निर्माण करायचे आहे. आपल्याला दूध संघाचे पुननिर्माण करायचे आहे, सांगाल तो भाव दुधाला मिळेल, कारण दूध संघ तुमचाच असणार आहे. सोयाबीनपासून तेलनिर्मितीच्या तीन फॅक्टर्‍या निर्माण करायच्या आहेत. त्यामुळे या पुढे फक्त विकासाला मतदान करा, नात्यागोत्याच्या राजकारणाला बळी पडू नका. आजपर्यंत सोयरेधायरे बघून मतदान केले, तर ३५ वर्षे मागास राहिलो, अशा शब्दांत प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. सभेच्या सुरूवातीस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख सूर्यकांत सोडसे, प्रा.किशोर पानसे, बाळासाहेब हडोंग्रीकर, भाजपचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ कुकडे आदींनी आपले विचार करून, विरोधकांवर सडकून टीकास्त्र डागले. या जाहीर सभेला प्रचंड मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली होती. 
तर या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख सूर्यकांत सोडसे, प्रा. किशोर पानसे, बाळासाहेब हडोग्रीकर, भाजपचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ कुकडे, भैरवनाथ शुगर वर्क्स वाशीचे केशव सावंत, जिल्हा युवासेना प्रमुख बाळासाहेब मांगले, शिवसेना तालुका प्रमुख अ‍ॅड. सत्यवान गपाट, तालुका संघटक शिवहार स्वामी, गटनेते नागनाथ नाईकवाडे, बंडू खोसे, विकास तळेकर, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख पूजाताई उकिरडे, बिभीषण खामकर, नितीन रणदिवे, पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता तोडकर, सर्कल प्रमुख राजाभाऊ सुकाळे, गटप्रमुख सुनील मोरे, श्रीमंत शिंदे, शाखाप्रमुख सोमनाथ शिंदे, चेअरमन सुदर्शन शिंदे, सुरेश वाकचौरे, सरपंच राजेंद्र काशीद, उपसरपंच अतुल चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य विष्णू मुरकुटे, चेअरमन विश्वंभर भराटे, पिंपळवाडीचे सरपंच सुनील उंदरे, मंडवाचे सरपंच नितीन रणदिवे, दश्मीगावचे सरपंच पोपट मोरे आदींसह महिला, पुरूष व तरूणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक