२४३ भूम-परंडा-वाशी विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीचे लोकप्रिय उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांचा प्रचार सुरु असून, याच अंतर्गत, कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, युवा नेते मा. गिरीराज सावंत साहेब यांनी भूम अंतरवाली जेजला तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार दौरा केला, ज्यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

२४३ भूम-परंडा-वाशी विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीचे लोकप्रिय उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांचा प्रचार सुरु असून, याच अंतर्गत, कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, युवा नेते मा. गिरीराज सावंत साहेब यांनी भूम अंतरवाली जेजला  तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार दौरा केला, ज्यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गावागावात घेण्यात आलेल्या बैठकीत श्री. गिरीराज सावंत यांनी तानाजीराव सावंत साहेबांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने केलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती दिली. शहरी आणि ग्रामीण भागातील विकास कामांसाठी प्रा. सावंत यांनी दिलेला ऐतिहासिक निधी, रोजगाराच्या संधी, आणि सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजनांबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

विकासाच्या दृष्टिकोनातून सावंत साहेबांचे योगदान...

गिरीराज सावंत यांनी स्पष्ट केले की, प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेबांनी परंडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगून, मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यांनी २०२२ मध्ये मंत्रीपद स्वीकारल्यानंतर, या मतदारसंघात दोन हजार कोटी रुपयांचा ऐतिहासिक निधी आणला आहे. विशेष म्हणजे, निधीचे वाटप करताना त्यांनी विरोधकांच्या गावांनादेखील मदत केली, दुजाभाव न करता मतदारसंघातील सर्व गावांना विकासासाठी निधी दिला.

सर्वसामान्यांसाठी प्रा. तानाजीराव सावंत साहेबांनी सुरु केलेला आशिया खंडातील पहिला फिरता दवाखाना एक आदर्श उपक्रम ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाच्या आरोग्य, शिक्षण, आणि रोजगाराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.

परंडा मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी, येत्या २० नोव्हेंबर रोजी धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेबांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन गिरीराज सावंत यांनी केले. या दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

प्रा. तानाजीराव सावंत यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळे मतदारसंघात सर्वांगीण विकासाची स्वप्न पूर्ण होत आहेत. त्यांचे नेतृत्व आणि कार्यक्षमतेमुळे मतदारसंघाचे चित्र बदलत आहे, ज्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक