*‘तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मी म्हातारा झालो नाही…’, शरद पवारांचा महायुतीला इशारा*
*‘तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मी म्हातारा झालो नाही…’, शरद पवारांचा महायुतीला इशारा*
धाराशिवमधील परांडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत शरद पवार यांनी महायुतीला थेट इशारा दिला आहे.
महाविकास आघाडीकडून खासदार शरद पवार हे विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना राज्यभरात दौरे करून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. शरद पवारांनी आज धाराशिवमध्ये जाहीर सभा घेतील यावेळी त्यांनी महायुतीवर निशाणा साधा इतकंच नाहीतर राज्यातील सत्ता बदलणारच असा निर्धारही शरद पवारांनी व्यक्त केला आहे. सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, ओमराजे निंबाळकर मला तुमची गोष्ट आजिबात पटली नाही. या वयातही मी फिरतो असे तुम्ही म्हणालात, मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. शांत बसणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत निर्धारच व्यक्त केला. पुढे शरद पवार असेही म्हणाले, या लोकांच्या हातात सत्ता देऊन तुमच्या प्रश्नांची सोडवणूक या महाराष्ट्रात होतेय. हे बघितल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही.