खासदाराच्या मनमानीला कंटाळून युवा सेना राज्य विस्तारक प्रतीक रोचकरी भाजपातआमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला भाजपप्रवेश
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला भाजपप्रवेश
धाराशिव, दि. 15 -
उबाठा गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मनमानीपणाला कंटाळून युवा सेनेचे राज्य विस्तारक प्रतीक रोचकरी यांनी शिवसेना उबाठा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. खासदाराच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील रोचकरी यांनी शुक्रवारी तुळजापूर येथे भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
मागील अनेक वर्षांपासून तुळजापूर तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यात युवकांचे सशक्त संघटन केले. त्यातून युवा सेना वाढवली. मात्र आपल्या कामाची दखल न घेता, नेहमी पाण्यात पाहिले गेले. खासदाराच्या मनमानीमुळे आणि पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करण्याच्या कार्यपध्दतीला कंटाळून शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत असताना वाईट वाटत असल्याची भावना रोचकरी यांनी व्यक्त केली. युवकांचे संघटन वाढवत असताना जिल्ह्यातील नेतृत्वाने कौतुकाची थाप देण्यापेक्षा नेहमी डावलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून आपण भाजपात प्रवेश करीत असल्याचे रोचकरी यांनी सांगितले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुद्दावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्पही रोचकरी यांनी यावेळी केला. त्यांच्यासह त्यांचे सहकारी पदधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेला खिंडार पडले आहे.
वडार क्रांती संघाचा आमदार पाटील यांचा जाहीर पाठींबा
वडार समाजातील अनेक अडीअडचणी सोडवून गोरगरीबांना न्याय आणि वडार समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना वडार क्रांती संघाच्यावतीने जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. वडार क्रांती संघाचे राज्याध्यक्ष बालाजी पवार, धाराशिव जिल्हाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, तुळजापूर तालुकाध्यक्ष सुहास पवार, कळंब तालुकाध्यक्ष दत्तात्रय कुर्हाडे यांनी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत वडार क्रांती संघाचा आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि महायुतीला जाहीर पाठींबा दिला.