तुळजापूर विधानसभा महायुतीचे उमेदवार श्री.राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आशीर्वाद यात्रेतून गडदेवधरी, शिंगोली, शिंगोली तांडा, जहागीरदार वाडी येथील मतदारांशी संवाद साधला...

तुळजापूर विधानसभा महायुतीचे उमेदवार श्री.राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आशीर्वाद यात्रेतून गडदेवधरी, शिंगोली, शिंगोली तांडा, जहागीरदार वाडी येथील मतदारांशी संवाद साधला...
श्री.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी गेल्या ५ वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती आपल्या सर्वांसमोरच आहे. तांडा सुधार योजनेतून राणादादांनी भरपूर विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. 

कौडगाव एमआयडीसीमुळे आपल्या गावातील तरुणांना रोजगार मिळणार आहे. अर्थकारणाला मोठी चालना मिळणार आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम सुरु झाले आहे. धाराशिव रेल्वेस्टेशन आता मोठे जंक्शन होणार आहे. त्यामुळे येथे लहान मोठे व्यवसाय सुरु होऊन येथील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. 

एवढ्यावरच न थांबता आपल्याला आणखीन विकास साधायचा आहे. मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. यासाठी त्यांना पुन्हा एकदा प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन केले.  

यावेळी गेल्या ५ वर्षात दादांनी केलेल्या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले, ही गावे आदरणीय डॉक्टर साहेबांपासून सतत आपल्या कुटुंबा सोबतच आहेत. पुढेही राहणार आहेत, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, आमच्या गावांतून मोठे मताधिक्य देऊ अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली.

#पुन्हा_एकदा_राणादादा #संवाद #दौरा #Tuljapur #Vidhansabha2024

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक