परंडा विधानसभा मतदारसंघात डॉ. प्रा. तानाजीराव सावंत साहेबांच्या प्रचारार्थ स्नेह भेटी
परंडा विधानसभा मतदारसंघात डॉ. प्रा. तानाजीराव सावंत साहेबांच्या प्रचारार्थ स्नेह भेटी कार्यक्रम
राहुल कोरे
आज भुम तालुक्यातील वालवड या गावांमध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि 243 परंडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रा. तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रचारानिमित्त स्नेह भेटी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी कार्यसिध्दी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष युवा नेते माननिय श्री.गिरीराज (दादा) तानाजीराव सावंत साहेब यांची प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यक्रम घेण्यात आला.तसेच यावेळी चंद्रकांत सरडे संतोष बाबर शरद जाधव शुभम मोहीते उपस्थित होते
आजपर्यंत सावंत साहेबांच्या नेतृत्वात मतदारसंघात ऐतिहासिक हजारो कोटींचा निधी साहेबांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या विकासाची दूरदृष्टी आणि विकासप्रिय नेतृत्वामुळे मतदारसंघाचे सर्वांगीण विकासाचे स्वप्न सत्यात उतरत आहे.
या अभूतपूर्व सर्वांगीण विकासकामांमुळे, येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी परंडा विधानसभा मतदारसंघातील आम्ही सर्वजण साहेबांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निश्चय यावेळी सर्वांनी केला.
#तानाजीरावसावंत #शिवसेना #परंडा #विकास #मतदारसंघविकास #महायुती #TanajiSawant