विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संवाद दौरा...वाशी, तालुकाही लढाई फक्त विजयासाठी नाही तर विकासासाठी आहे..
विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संवाद दौरा...वाशी, तालुका
ही लढाई फक्त विजयासाठी नाही तर विकासासाठी आहे..
विझोरा, दसमेगाव, बावी ता.वाशी येथे घोंगडी बैठकीत तरुणांनी, ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि हाच तरूण आता जागा झाला आहे! आधीच्या सत्ताधाऱ्यांनी वीस वर्षे आमच्या पिढ्यांना फसवलं, पण आजचा तरुण फसणार नाही. हे केवळ निवडणुकीत विजय मिळवण्याचे युद्ध नाही, तर ही विकासाची लढाई आहे.
माझा शेतकरी सायकल किंवा बैलगाडीतून प्रवास करणार नाही, तर आता माझा शेतकरी स्वतःच्या फोर व्हिलरमधून प्रवास करेल, अशी माझी महत्त्वाकांक्षा आहे. म्हणून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणुकीत केवळ विजयी नाही, तर लाखांच्या लीडने विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले.
महायुती सरकारचा संकल्प हा शेतकर्यांसाठी कर्जमाफीचा, आपल्या भगिनींसाठी २१०० रुपये देण्याचा, गरिबांसाठी संपूर्ण मोफत उपचार सुरू ठेवण्याचा आहे. गेल्या १५ वर्षे ज्यांना काम करता आले नाही, ते आता निरर्थक टीका करीत आहेत. आता विकासाचे पर्व सुरू झाले आहे, आणि आपला मार्ग देखील प्रगतीचा आहे.
आजपर्यंत भूम परंडा वाशी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आलेलो आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणून तिन्ही तालुक्यात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.