*तुळजापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार ऍड.धीरज पाटील यांच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ*



*तुळजापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार ऍड.धीरज पाटील यांच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ*
तुळजापूर–  येथील केवडकर मंगल कार्यालयात महाविकास आघाडीचे उमेदवार अँड. कुलदिप उर्फ धीरज पाटील यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला. माजी मंत्री आमदार अमित देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, काँग्रेस नेते विश्वासआप्पा शिंदे, संजयमामा निंबाळकर यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. सभेला असंख्य पदाधिकारी आणि  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि पाहुण्यांचा सत्कार करून करण्यात आली. आपल्या उद्घाटनपर भाषणात अँड. कुलदिप पाटील यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणे ही महाविकास आघाडीची पारदर्शकता दर्शविते असे सांगितले. त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी पूर्वीच्या नेत्यांचे योगदान अधोरेखित करताना सध्याचे सरकार दिशाभूल करत असल्याचे सांगितले.

प्रमुख पाहुणे माजी मंत्री आमदार अमीत देशमुख यांनी मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर भाष्य करत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे योगदान मोठे असल्याचे सांगितले. याशिवाय महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात अधिक सुविधा देण्याचे वचन देत, शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायद्याची मागणी केली.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भाषणात धाराशिव तालुक्याच्या विकासासंबंधी मुद्दे मांडले. विरोधक श्रेय घेण्यासाठी उद्घाटनांचे नाटक करत असल्याचे सांगत अँड. धीरज पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी अमोलभैय्या कुतवळ यांनी आभार मानले, तर सुत्रसंचालन अग्निवेश शिंदे व जुबेर शेख यांनी केले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक