धाराशिव: महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी
धाराशिव: महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी
-----------
धाराशिव - महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार व विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या, रविवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. कळंब तालुक्यातील मूळगाव देवधानोरा येथील ग्रामदैवत श्री खंडोबाच्या मंदिरात नारळ वाढवून हा शुभारंभ करण्यात येणार आहे. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्टार प्रचारक खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या सोहळ्यासाठी शिवसैनिक, महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे