आई तुळजाभवानी माते, जनसेवेच्या कार्यासाठी बळ दे !यंदाही विजय आपलाच : आमदार राणाजगजितसिंह पाटील
आई तुळजाभवानी माते, जनसेवेच्या कार्यासाठी बळ दे !
यंदाही विजय आपलाच : आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव -आई तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन २४१-तुळजापूर विधानसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून नामनिर्देशन दाखल केले. मागील पाच वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण जनकल्याणाच्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा तुळजापूर मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या व संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या आशीर्वादाने आणि मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या सोबतीने यंदाही विजय आपलाच असेल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.