कावळेवाडी ग्रामपंचायत चे सरपंच अँड अजित खोत सह सहा सदस्य यांना अपात्र करण्याचा अर्ज जिल्हाधिकारी यांनी फेटाळला अँड अजित खोत यांना मोठा दिलासा

कावळेवाडी ग्रामपंचायत चे सरपंच अँड  अजित खोत सह सहा सदस्य यांना अपात्र करण्याचा अर्ज जिल्हाधिकारी यांनी फेटाळला 


 अँड अजित खोत यांना मोठा दिलासा 

 सविस्तर वृत्त असे की कावळेवाडी ग्रामपंचायतची निवडणूक दोन वर्षांपूर्वी पार पडली या निवडणुकीमध्ये एडवोकेट अजित खोत जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले त्याचबरोबर उपसरपंच ही अर्चना गुणवंत कावळे म्हणून निवड झाली ग्रामपंचायत मध्ये विरोधामध्ये  निवडणूक लढवून पराजित झाल्याचा शल्य मनात धरून जीवन वीर यांनी एडवोकेट अजित खोत सरपंच  सह इतर उपसरपंच अर्चना कावळे सदस्य  उमाबाई कावळे आशाबाई कावळे  धनराज मेकिले हनुमंत कावळे  अश्विनी शिंदे  विरुद्ध   निवडणूक खर्च बँक खात्यातून न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे अशा पद्धतीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केलेला होता त्याची सुनावणी जिल्हाधिकार्यालयात झाली एडवोकेट अजित खोत यांच्यासह सहा सदस्य च्या बाजूने  एडवोकेट सुधाकर मुंडे व अडवोकेट विशाल साखरे यांनी बाजू मांडली आणि त्यांनी केलेला युक्तिवाद ग्रह धरून निवडणूक खर्च वेळेत सादर केला असल्याने बँकेतून नाही केला म्हणून त्यांना अपात्र ठरवणार ठरवता अशा पद्धतीचा निर्णय आज जिल्हाधिकारी धाराशिव यांनी आज दिला आहे 

यावेळी एडवोकेट अजित खोत यांच्याशी सदर निर्णयाबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी जिल्हाधिकारी यांनी जनतेच्या मताचा आदर ठेवणारा निर्णय घेतला असून  गाव विकास कामाला आढा घालणाऱ्यांना एक प्रकारे चपराकच असल्याचं मत त्यांनी प्रकट केले या निर्णयाने गावातील पुरुष तरुण व महिलांनी मोठ्या प्रमाणावर आनंद उत्सव साजरा करण्यात आला

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक