धाराशिव मतदार संघातून महायुतीकडून सुधीर पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित
धाराशिव मतदार संघातून महायुतीकडून सुधीर पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित
धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) - विधानसभेची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी भरण्याच्या पाचव्या दिवसापर्यंत महायुतीकडून धाराशिव मतदार संघामध्ये अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशातच खात्रीशीर मिळालेल्या माहितीनुसार या मतदारसंघातून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या धनुष्य बाणाकडून माजी जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला असून पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया म्हणजेच उमेदवारी जाहीर करण्याची प्रक्रिया अत्यंत संत गतीने धाराशिव मतदार संघामध्ये महायुतीकडून सुरू आहे. कारण शिवसेना (ठाकरे) च्यावतीने विद्यमान आमदार कैलास पाटील यांना पहिल्याच यादीमध्ये स्थान देऊन महायुतीला थेट प्रती आव्हान दिले आहे. त्यामुळे तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी महायुतीचे त्रिधात्रिपट उडाली असून अद्यापपर्यंत महायुतीकडून वेगवेगळ्या नावाची चाचपणी करण्यामध्येच त्यांनी धन्यता मानलेली आहे. मात्र आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सुधीर पाटील यांना या मतदारसंघाची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.