*तुळजापुरचा तिढा सुटला; पाच टर्म आमदाराला नाकारलं, नवख्या चेहऱ्याला संधी*
*तुळजापुरचा तिढा सुटला; पाच टर्म आमदाराला नाकारलं, नवख्या चेहऱ्याला संधी*
तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून काँग्रेस पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अॅडवोकेट धीरज पाटील कदम यांना विधानसभेची लॉटरी लागली आहे.
तुळजापूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालोकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवंगत आमदार साहेबराव हंगरगेकर यांच्यानंतर मधुकर चव्हाण हे सलग पाच वेळा याच मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर भाजपने ही जागा खेचून आणली होती. आपला बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी अॅडवोकेट धीरज कदम पाटील हे पहिल्यांदाच येथून आपले नशीब आजमावणार आहेत.