महाविजयाचा महासंकल्प…!!!पंढरीचा वारकरी विधानसभेचा मानकरीपालकमंत्री तानाजी सावंत यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाविजयाचा महासंकल्प…!!!
पंढरीचा वारकरी विधानसभेचा मानकरी
पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
आज दि. २९ रोजी मी शिवसेना-महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. आजच्या प्रचार सभेला केवळ माणसांची गर्दी होती अस नाही तर फाटक्या धोत्रातला बाप, तीन रंगाचं लुगडं नेसलेली माय अन् डोळ्यांत उद्याचं उज्वल भविष्य घेऊन आलेली तरुणाई होती. गेली ५ वर्ष त्यांनी माझ्यावर दिलेलं विकासाचं ओझ मी पेलू शकलो याचा आनंद वाटला परंतु आता धवल क्रांती झाली पाहिजे आणि सर्वांना समृद्ध करणारी अर्थक्रांती झाली पाहिजे याचं ओझ आता माझ्यावर आहे आणि आजचा तुमचा विश्वास पाहिला असता मला याची खात्री आहे की आपण लाखोंच्या फरकाने निवडून येऊ आणि आपलं हे स्वप्नं आपणच पूर्ण करू.
तानाजी सावंत म्हणाले  सर्वच वरिष्ठ नेत्यांनी देखील विश्वास दाखवला, मी त्यांच्या देखील विश्वाला तडा जाऊ देणार नाही. माझा हा भाग सुजलाम सुफलाम केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

या महाविजयी सभेला धाराशिवचे शिवसेना जिल्हा समन्वयक गौतम लटके सर व दत्ता आण्णा साळुंखे यांनी सूत्रसंचलन केले. तर व्यासपीठावर लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मारूती क्षीरसागर, रिपाइंचे भागवतराव शिंदे, मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराव शिंदे, रिपाइंचे राज्य सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नवनाथआप्पा जगताप, भारतीय जनता पक्षाचे विधानसभा समन्वयक बाळासाहेब क्षीरसागर, ज्येष्ठ नेते शिवाजीराव भोईटे, माजी आमदार तथा भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुजीतसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आदींसह महायुतीच्या बहुसंख्य मान्यवरांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक