धाराशिव -कळंबचं हिंदुत्व सुरक्षित ठेवायचं असेल तर एकच पर्याय आहे ते म्हणजे सूरज साळुंखे

धाराशिव -कळंबचं हिंदुत्व सुरक्षित ठेवायचं 
असेल तर एकच पर्याय आहे ते म्हणजे सूरज साळुंखे 
--------
धाराशिव जिल्हा हिंदुत्व विरोधी शक्तींची कार्यशाळा झाला आहे...
कोणत्याही हिंदुत्व विरोधी संघटनेने यावं आणि इथं जाळं टाकावं की बस्स...
जास्त काही प्रतीक्षा न करता त्यांचं बस्तान बसलेलं बघायला मिळतं.

ब्रिगेड बामसेफी विचारांना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भूसभुशीत जमिन कुठं मिळाली असेल तरी याच धाराशिव जिल्ह्यात.
छत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड करणारे महाभाग जेवढे महाराष्ट्रात आढळतात तेवढे एकट्या धाराशिव जिल्ह्यात निपजले आहेत.
इथली सगळी सामाजिक रचना गोंधळून जावी एवढा वेग यां संघटनाना लाभलाय.

हिंदुत्वाच्या विरोधात, इतिहासातील मोडतोड करण्यासाठी जे प्रयोग झाले त्यात सर्वोच्च म्हणजे या धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली टिपू सुलतानची प्रतिमा पूजन्यापर्यंतचं टोक या लोकांनी गाठलेलं बघायला मिळालंय.

गोवंश तस्करी, धार्मिक उन्माद, नियमबाह्य मिरवणुका याने उच्छाद मांडलाय पण कोणीच विरोधात शब्द काढायला तयार नाही कारण या संघटनानी मागच्या 25 वर्षात या जिल्ह्यातील नागरिकांचा आत्मविश्वास काढून घेण्याचं काम केलंय... आणि त्या जागी जातीप्रेमाचं रोपटं लावलेलं बघायला मिळतं.

वाढता जातीयवाद आणि संपत चाललेलं हिंदूत्व...
यातूनच स्वतःला ठाकरे घराण्यांचे निष्ठावंत म्हणवणाऱ्या आमदार खासदारांनी एका हिंदु साधूंवर कठोर कारवाई करावी असं जाहीर पत्र मुख्यमंत्री महोदयांना देण्याचं धाडस केलं कारण त्यांना इथली गठ्ठा मतदार सामाजिक परिस्थिती बदलली आहे याची जाणीव झाली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सामान्यांना याचा त्रास होतोय,जनतेला एक धाडसी कट्टर हिंदुत्ववादी तरुण चेहरा आपला प्रतिनिधी म्हणून पाहिजे आहे.
आज धाराशिव शहरात शेकडो राजकीय नेत्यांची तुलना केली तर या तत्वात केवळ एकच नाव बसते ते म्हणजेच
 Suraj Salunke हे होय.

आम्हाला सिमेंटच्या गटारी, रोड, बागबगिचे बांधणारा विकास करणारा नेता हवा आहेच परंतु त्यापेक्षाही आमच्यावर येऊ घातलेल्या संकटात छातीचा कोट करून हाती भगवा धरणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा निडर मावळा नेता म्हणून हवा आहे...
आणि या कसोटीवर उतरणारे एकमेव नाव म्हणजे शिवसेना जिल्हाप्रमुख सूरज साळुंके हेच आहेत.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक