धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघात मनसेचे देवदत्त मोरे यांना तिकीट जाहीर
धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघात मनसेचे देवदत्त मोरे यांना तिकीट जाहीर
धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - उद्योजक कसबे तडवळा येथील रहिवासी असलेले देवदत्त मोरे यांना धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे तिकीट मिळाले आहे. त्यामुळे मनसेने विधानसभा निवडणुकीत मोरे यांना उमेदवार जाहिर केली आहे
धाराशिव कळंब मतरसंघात महायुतीने या मतदारसंघात अद्याप उमेदवाराची घोषणा केली नसल्यामुळे नागरिकांना उत्सुकता लागलेली आहे. असे असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी पाचव्या यादीमध्ये धाराशिव मतदार संघासाठी उद्योजक देवदत्त मोरे यांची अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे मनसेच्या गोठात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोरे यांच्या माध्यमातून या मतदारसंघात मनसैनिकांना नवचैतन्य मिळून पुन्हा ते जोमाने निवडणुकीच्या कामासाठी लागणार आहेत.