मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांची धाराशिव कळंब मधील संभाव्य उमेदवार आनंद पाटील यांनी अंतरवली येथे जाऊन दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची माहिती देत सविस्तर चर्चा करून आशीर्वाद घेतले.

मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांची धाराशिव कळंब मधील संभाव्य उमेदवार आनंद पाटील यांनी अंतरवली येथे जाऊन दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची माहिती देत सविस्तर चर्चा करून आशीर्वाद घेतले. 
युवा नेते आनंद पाटील यांनी अपक्ष म्हणून कळम धाराशिव मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केलेला आहे या अर्जाची त्यांनी मराठा योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांची अंतरवली येथे भेट घेऊन माहिती दिली तसेच त्यांचे आशीर्वाद घेतले तसेच मतदार संघातील एकूण गणिते कशी जुळवायची यासंदर्भात ही सविस्तर अहवाल दिला. 
   आनंद पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून केवळ मतदारसंघातूनच नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून अनेक जणांनी त्यांना शुभेच्छा देऊन सहकार्य करण्याची भावना बोलून दाखवलेली आहे. 

     मतदार संघातील शेतकरी, महिला ,ओबीसी ,सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रितपणे घेऊन पुढे जाणारा चेहरा म्हणून आनंद पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहे तरुणाच्या हातांना निश्चितपणाने रोजगार उपलब्ध करून देतील अशी भावना देखील मतदार संघातील तरुणांमध्ये निर्माण झालेली आहे. 

        या सर्व बाबींची त्यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन श्री मनोज दादा जरांगे पाटील यांना माहिती दिली.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक