जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी येथे वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा. वाचनाने मन, मणगट व मेंदू सक्षम होतो....प्रकाश पारवे

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी येथे वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा. वाचनाने मन, मणगट व मेंदू सक्षम होतो....प्रकाश पारवे 
 धाराशिव वार्ताहर 
आज दिनांक 15 ऑकटोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती, मिशाईल मॅन ए. पी. जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून भरातभर साजरा केला जातो आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी ता धाराशिव येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला, प्रारंभी डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर डॉ कलामांच्या जीवन चरित्रावर शिक्षण विस्तार अधिकारी श्री प्रकाश पारवे यांनी माहिती दिली व वाचनाने विद्यार्थ्यांचे  मन, मनगट व मेंदू सक्षम होतो असे प्रतिपादन केले, त्यानंतर मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी, श्रीमती सुनीता कराड, श्रीमती क्रांती मते, श्री दिनेश पेठे यांनी  कलामांच्या जीवन चरित्र्यावर माहिती सांगितली. तसेच आज जागतिक हात धुवा दिन असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी स्वच्छते चे महत्व सांगितले व हात धुवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व बाहेरून घरी आल्याबरोबर हात पाय स्वच्छ धुवावेत असे सांगितले. तसेच वाचन प्रेरणा दिवस  सलग घड्याळी दोन तास विद्यार्थी व शिक्षक यांनी सलग वाचन करून  साजरा केला. यामद्ये शाळेतील 265 विद्यार्थी व सर्व शिक्षक सहभागी झाले होते. याप्रसंगी येडशी बिट चे शिक्षण विस्तार अधिकारी श्री प्रकाश पारवे, येडशी चे केंद्रप्रमुख श्री विवेक सरवदे, उपळ्याचे केंद्रप्रमुख श्री शेशे राव राठोड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सत्यशीला म्हेत्रे यांनी केले, आभार प्रदर्शन श्रीमती वर्षा डोंगरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री  उत्तम काळे, मंजुषा नरवटे, सुलक्षणा ढगे, श्री. हनुमंत माने, श्रीमती राधाबाई वीर, श्री दादासाहेब कचरे यांनी परिश्रम घेतले

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक