आ कैलास पाटील धाराशिव - कळंबसाठी हक्काचे पाणी का आणू शकले नाहीत ? - साळुंके खा राजेनिंबाळकर व आ पाटील यांची राजकीय इच्छाशक्ती संपली
आ कैलास पाटील धाराशिव - कळंबसाठी हक्काचे पाणी का आणू शकले नाहीत ? - साळुंके
खा राजेनिंबाळकर व आ पाटील यांची राजकीय इच्छाशक्ती संपली
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर परंडा भूम वाशी या मतदारसंघासाठी तर आ राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर मतदार संघासाठी उजनीमधून आणण्यात येणारे हक्काचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ते पाणी डिसेंबर २०२४ अखेर या दोन्ही मतदारसंघांमध्ये येणार आहे. मात्र, आ. कैलास पाटील यांनी धाराशिव व कळंब या मतदार संघासाठी ते पाणी आणण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत ? असा सवाल विचारीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांची राजकीय इच्छाशक्ती संपली असल्याचा घनाघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दि.१० ऑक्टोबर रोजी केला.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना साळुंके म्हणाले की, मराठवाड्याच्या हक्काचे २३.६६ टीएमसी पाणी आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने चुकीच्या पद्धतीने त्या कामाची निविदा काढली होती. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर प्राधान्यक्रम बदलून त्यासाठी ११ हजार ७०० कोटी रुपये मंजूर करून ती प्रक्रिया गतिमान करण्याचा प्रयत्न केला. काही तांत्रिक बाबी वगळता हे काम अंतिम टप्प्यात असून कुठल्याही परिस्थितीमध्ये डिसेंबर २०२४ अखेर जिल्ह्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर आ पाटील व खा राजेनिंबाळकर यांनी टक्केवारी व बदल्यांमध्ये पीएचडी मिळवली असल्याचा आरोप करीत ते महाले की, शहरातील अतिशय खराब होऊन उघडले असून प्रत्येक रस्ता व गल्लीत धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या दोघांनीच संपूर्ण शहरातील रस्त्यांचा खेळखंडोबा केला असल्यामुळे धुळीपासून श्वसनाचे आजार झाले व होत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. तसेच विशेष म्हणजे आमदार झाल्यापासून मतदार संघाच्या विकासासाठी एक रुपया देखील आणता आला नाही. खा राजेनिंबाळकर व आ पाटील यांना आता कुठलेच काम राहिले नसल्यामुळे केवळ बिनबुडाचे आरोप करून महायुतीच्या नेत्यांना बदनाम करायचे सत्र सुरू केले असे म्हणत त्या दोघांवर चौफेर हल्ला साळुंके यांनी चढविला.