जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी च्या विध्यार्थ्यानी 100टक्के मतदान करण्याविषयी जवळच्या नातेवाईकांना 1500 पत्र पाठऊन केले आवाहन*

**जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी च्या  विध्यार्थ्यानी 100टक्के मतदान करण्याविषयी जवळच्या नातेवाईकांना 1500 पत्र पाठऊन केले आवाहन*  
धाराशिव वार्ताहर 
*   निवडणुकीमध्ये मतदानाची तक्केवरी वाढावी म्हणून शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात ,तरी पण निवडणुकीत १०० टक्के मतदान होत नाही लोकांमध्ये मतदानविषयी जागृती व्हावी व देशात लोकशाही मजबूत व्हावी यासाठी आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी जिल्हा परीषद प्राथमिक शाळा आळणी च्या वतीने मतदान जनजागृती करण्यासाठी सकाळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली . व अठरा वर्षा च्या पुढील सर्व मतदारांनी मतदान करावे असे आवाहन करण्यात आले तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे परगावी राहणारे जवळचे नातेवाईक ,मामा,मामी,मावशी , आत्या , आजी,आजोबा व जवळच्या नातेवाईकांनी 100 तक्के मतदान करावे म्हणून पोस्टकार्ड  पाठऊन आवाहन केले .प्रत्येक  विध्यर्थ्याने किमान पाच पोस्टकार्ड  पाठविली .या कार्याचा शुभारंभ मा.श्री अशोक पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक , मां. श्रीमती सुधा साळुंके शिक्षणाधिकारी माध्यमिक ,  मां .श्री असरार सय्यद  गट शिक्षाधिकारी पं .स .धाराशिव यांच्या हस्ते करण्यात आला. व  पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांच्या जवळच्या नातेवाईक यांना 1500 पत्रे एकाच वेळी  पाठविण्यात आली या कार्यात शाळेतील 260 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला मा.शिक्षण अधिकारी प्राथमिक,माध्यमिक , गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व मुलांचे कौतुक केले व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन मुलांची गुणवत्ता पाहिली  व समाधान व्यक्त केले .तसेच सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले .यावेळी  मा.श्री प्रकाश पारवे,श्री भारत देवगुडे, शिक्षण विस्तार अधिकारी , मा.श्री निलेश नागले केंद्रप्रमुख हे उपस्थित होते . सदर उपक्रमात श्रीमती सुनीता कराड,वर्षा डोंगरे,मंजुषा नरवटे,क्रांती मते,सुलक्षणा ढगे,सत्यशिला म्हेत्रे ,राधाबाई वीर ,श्री उत्तम काळे,दिनेश पेठे ,हनुमंत माने ,दादासाहेब कचरे यांनी परिश्रम केले.*

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक