तेरणा सभासद मेळाव्याच्या कार्यक्रमावरून सावंतावर टीका करण्यापेक्षा स्वतःचं कर्तुत्व पहा - अँड अजित खोत यांची टीका

तेरणा सभासद मेळाव्याच्या कार्यक्रमावरून सावंतावर  टीका करण्यापेक्षा स्वतःचं कर्तुत्व पहा -अँड अजित खोत यांची टीका 
धाराशिव 

बारा वर्षे बंद कारखाना कोणी पाडला ? सभासदाला रानोमाळ ऊस गाळपसाठी कोणी लावले ? तुम्ही नुसता कारखाना नाही बंद पडला तर भंगार सुद्धा विकून खालले. भंगार चोराची उपमा तुम्हाला कोणी दिली ? कारखान्याला तुम्ही वाऱ्यावर सोडल. खुप कर्तुत्ववानतुमचे नेतृत्व होते तर तुम्ही कारखाना चालवायला का घेतला नाही असा सवाल करीत ऍड अजित खोत यांनी टीका केली.

तुम्ही वाटोळे केलेलं पालकमंत्री डॉ सावंत यांनी नीट केले. तुम्ही एक पिठाची गिरणी उभा केली नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा काटा तुम्हीच काढला,असे एक युनिट दाखवा जे तुम्ही चालू केले असा सवाल केला. सावंत यांनी कारखाना चालू केला,शेतकऱ्याचा शेतातील ऊस गाळप करून शेतकऱ्याला 2 हजार 825 रुपये असा विक्रमी भाव दिला. सात टीएमसी पाणी धाराशिव जिल्हा आणण्यासाठी करोडो रुपयांचा निधी आणला. 

तुमचे अकर्तृत्व आणि रड गाणे ऐकायला जनतेलास वेळ नाही. कोणाच्या तरी लाटेत निवडून यायचं ह्याला विकासशील नेतृत्व म्हणत नाहीत. सावंत यांच्यावर टीका करण्यासाठी बगलबच्चे पुढे करू नका, हिम्मत असेल तर पत्रकार परिषदमध्ये समोरासमोर या आणि विकास कोणी केला यावर चर्चा करा असे आव्हान खोत यांनी दिले आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक