उद्या तेरणा कारखान्याच्या सभासदांचा स्नेह संवाद मेळावा पालकमंत्री ना तानाजीराव सावंत सभासदांना करणार मार्गदर्शन कार्यक्रमाची जंगी तयारी
उद्या तेरणा कारखान्याच्या सभासदांचा स्नेह संवाद मेळावा
पालकमंत्री ना तानाजीराव सावंत सभासदांना करणार मार्गदर्शन
कार्यक्रमाची जंगी तयारी
दिशा धाराशिव (प्रतिनिधी)
दि.२३ - तालुक्यातील ढोकी येथील मराठवाड्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात पहिला व महाराष्ट्रातील दुसरा म्हणून लौकिक असलेल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भैरवनाथ शुगर वर्कसचे सर्वासर्वे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनखाली शेतकरी सभासद यांचा स्नेह संवाद मेळावा कारखाना गेटसमोरील मैदानावर मंगळवार दि.२४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी कारखाना स्थळी जंगी तयारी पूर्ण झाली असून कारखान्याला पुन्हा गतवैभव प्राप्त झाल्यानंतर हा पहिलाच मेळावा असल्यामुळे ना सावंत कोणती घोषणा करणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
भैरवनाथ शुगर वर्कस युनिट ६ संचलीत तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक ना. प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी कारखाना सुरू करुन तब्बल ३ लाख १२ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप करून शेतकऱ्यांना मोठा दिलास दिला आहे. तेरणा पट्टयातील शेतकरी व कारखान्याचे सभासद यांचे नाते आधिक घट्ट व्हावे यासाठी हा स्नेह संवाद मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, आष्टी, सांगली ऊस विकास मार्गदर्शक डॉ संजीव माने आदी उपस्थित राहणार आहेत.
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सन २०१२ पासून गाळपा अभावी बंद होता. हा कारखाना बंद असल्यामुळे भैरवनाथ शुगर वर्कस सर्वासर्वे ना प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ शुगरने २५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला आहे. भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत यांनी युध्दपातळीवर काम करुन अवघ्या ६ महिन्यांत कारखाना गाळपास सज्ज केला. त्यानंतर मोठ्या उत्साही वातावरणात शेतकरी सभासदांनी कारखान्यास ऊस दिल्यामुळे भैरवनाथ शुगरने तब्बल ३ लाख १२ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून शेतकऱ्यांना २ हजार ८२५ रुपये भाव दिला. हा ऊस दर धाराशिव जिल्ह्यातील सर्वाधिक देणारा भैरवनाथ शुगर नंबर वन ठरला आहे. गाळप केलेल्या संपूर्ण उसाचे बिल पूर्णपणे शेतकऱ्यांना दिले आहे. हा कारखाना भैरवनाथ शुगरच्या पुढाकारातून सुरु झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गेला. विशेष म्हणजे कारखाना परिसरातील उद्योग व व्यवसायाला चालना मिळून व्यापार वाढला तर सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळून रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे तेरणा पट्टयातील ऊस उत्पादक सभासद व व्यापाऱ्यांमधून सावंत परिवाराचे विशेष कौतुक केले जात आहे.
हा स्नेह संवाद मेळावा कारखाना गेटसमोरील मैदानावर सकाळी १० वाजता होणार आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे वाटर प्रुफु सभा मंडप उभारुन कार्यक्रमाची जंगी तयारी पूर्ण झाली आहे. तसेच कारखान्याच्यावतीने येणाऱ्या शेतकरी सभासदांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तेरणा परिवार ऊस उत्पादक, सभासद व शेतकऱ्यांनी या स्नेह संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भैरवनाथ शुगर संचलीत तेरणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत यांनी केले आहे.