अतिरिक्त जिल्हा नियोजन अधिकारी श्री कुंटला यांची जिल्हा परिषद प्रा. शाळा आळणी येथे भेट*
वार्ताहर... धाराशिव
Ongc या कंपनी कडून शाळेसाठी मिळालेल्या साहित्याचा आढावा घेण्यासाठी व त्याची उपयोगिता तपासण्यासाठी अतिरिक्त जिल्हा नियोजन अधिकारी श्री कुंटला व धाराशिव चे गटविकास अधिकारी श्री चकोर यांनी भेट दिली त्यांच्या सोबत ongc चे समन्वयक श्री विनीत अरोरा, किरण निकम, सुधाकर गावंडगावे तसेच जिल्हा प्रारंभीक योजना अधिकारी श्री आदेश ठोंबरे सोबत होते. Ongc या कंपनी च्या csr फंडातून मिळालेल्या साहित्याचा वरील सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रत्येक वर्गात जाऊन आढावा घेतला व उपयोगिता तपासली असता सर्व अधिकारी यांनी शाळेचे खूप खूप कौतुक केले व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे कौतुक केले, व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते विषयी कौतुक केले बहुतेक मुलांनी सदर अधिकाऱ्यांशी इंग्रजी भाषेतून संवाद केला.शाळेचे मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी शाळेच्या भौतिक सुविधाविषयीं माहिती देऊन जास्तीत जास्त निधी शाळेस द्यावा अशी मान्यवरा कडे मागणी केली.यावर ongc च्या अधिकाऱ्यांनी शाळेची गुणवत्ता पाहून जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले