“नाठाळाचे माथी हाणू काठी”
“नाठाळाचे माथी हाणू काठी”
धाराशिव शहरा मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी चे नेते शरदचंद्र पवार व थोर पुरोगामी बुद्दी जिवी वर्गाचे वक्ते ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या बद्दल केलेल्या निंदाजनक वक्तव्याचा व या वक्तव्याला पुष्टी देणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा जाहीर निषेध केला.
एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरदचंद्र पवार व कोल्हापुरचे खासदार छत्रपती शाहू यांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराव यांनी अतिशय बेताल वक्तव्य केले. महाराष्ट्राचे जाणता राजा म्हणून घेणारे नेते शरद पवार हे यावेळी मूग गिळून गप्प होते, यामधून त्यांची बेगडी प्रतिमा दिसून येते. महाराष्ट्राला थोर संतांचा वारसा असताना देखील अशी वक्तव्य केली जातात हे अतिशय दुर्दैवी आहे.
तुम्ही इतके हिंदूद्वेष्टे का? तुम्ही मुक गिळून गप्प का बसलात? श्री स्वामी समर्थ, प्रभू श्री राम, वारकरी संप्रदायाचा अपमानाला तुमची मुक संमत्ती का? ज्ञानेश महाराव च्या तोंडी हिंदू देव देवतांच्या अपमानाची स्क्रिप्ट तुमचीच आहे का? तुम्हीच म्हटला होतात, राममंदिर बांधल्यानी कोरोणा जाणार आहे का? ज्ञानेश महाराव आज तीच भाषा बोलत आहे! तुमचा चेला जितुद्दिन आव्हाड ने प्रभू श्री रामचद्रांचा केलेला अपमान महाराष्ट्र विसरलेला नाही! तुम्ही स्वतः ला जाणते राजे संबोधून घेता... मंचावरचा हिंदू देव देवतांचां इतका विषारी अपमान आपण का थांबवला नाहीत? एखाद्या समाजाला खुश करण्यासाठी, त्यांच्या मतांसाठी अजून कोणत्या स्तराला जाणार आहात? तुम्हाला तमाम हिंदू समाज कदापि माफ करणार नाही! यावेळी शरद पवार व ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात घोषणाबाजी करुण वरील प्रश्न उपस्थीत केले.
तसेच शहर पोलीस स्टेशन मध्ये ज्ञानेश महाराव या महाभागावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. यावेळी धाराशिव शहर व परिसरातील प्रभु श्री रामचंद्र व श्री स्वामी समर्थ महाराजांचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.