*सोयाबीन पिका करीता किमान 6 हजार रुपये प्रती क्विंटल दर निश्चीती करा. शासकीय खरेदी केंद्र सुरु करा- शिवसेना प्रवक्ते ॲड. योगेश केदार यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन.*लवकरच याबाबत तोडगा काढला जाईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर पने उभे राहील. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.*
*सोयाबीन पिका करीता किमान 6 हजार रुपये प्रती क्विंटल दर निश्चीती करा. शासकीय खरेदी केंद्र सुरु करा- शिवसेना प्रवक्ते ॲड. योगेश केदार यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन.*
*लवकरच याबाबत तोडगा काढला जाईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर पने उभे राहील. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.*
*निवेदनात Adv योगेश केदार यांनी नमूद केले की, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून सोयाबीन पिकाचे लागवड मोठया प्रमाणात करतात. दरवर्षी वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सोयाबीन पिकाचे उत्पन्न व त्यावर होणाऱ्या खर्चात मोठी तफावत निर्माण होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत आहे. तसेच 2013-14 या वर्षामध्ये सोयाबीनचे शासकीय खरेदी दर 4600 रुपये प्रती क्विंटल होता परंतू 10 वर्षानंतर 2023 -24 मध्ये यात घट करण्यात आली असून खरेदी दर 4100 रुपये प्रती क्विंटल करण्यात आला आहे. याउलट सोयाबीन पिकाचे उत्पन्न घेण्याकरीता लागणाऱ्या मुलभुत वस्तुवरील महागाई 250 टक्केपेक्षा जास्तीची नोंदवली गेली आहे.*
*वर्ष 2024-25 मध्ये राज्य शासनाने सोयाबीनचे किमान खरेदी मुल्य 4892 रुपये एवढे निश्चीत केले आहे. चालू वर्षाचा महागाई दर लक्षात घेता शेतकऱ्यांच्या हाती सोयाबीन पिकातून नगन्य रक्कम शिल्लक राहत आहे. बहुतांश शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत चालला आहे.*
*त्यामुळे सोयाबीन पिका करीता किमान खरेदीमुल्य 6 हजार रुपये प्रती क्विंटल दर निश्चीती करुन शासकीय खरेदी केंद्र सुरु करणेबाबत आपल्या स्तरावरुन योग्य ते सहकार्य करावे. अशी विनंती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली.*
*'मी आजपर्यंत वेळोवेळी शेतकरी, कामगार, विद्यार्थी, मराठा समाज, ओबीसी समाज तसेच इतरही सामाजिक विषयावर मुख्यमंत्र्यांना अवगत केले. त्यावर शिंदे साहेबांनी दखल घेऊन मागण्या पूर्णच केल्या आहेत. वरील मागणी सुद्धा पूर्ण करतील असा विश्वास वाटतो- ॲड.योगेश केदार, प्रवक्ता शिवसेना'.*