*ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक प्रा.हरी नरके यांना धाराशिव शहरात विनम्र आदरांजली*
*ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक प्रा.हरी नरके यांना धाराशिव शहरात विनम्र आदरांजली*
*धाराशिव,दि.९ऑगस्ट :-* अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे वैचारिक स्तंभ ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा. हरी नरके यांच्या पुण्यतिथी निमित्त धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे समता परिषदेच्या वतीने प्रा.हरी नरके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र आदरांजली अर्पण केली.
यावेळी समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत, जिल्हाध्यक्ष बिभिषण खुने, धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, डॉ एन एम काझी,व्यंकट जाधव,राॅबीन बगाडे,भारत जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.